शब्दसमूहाबद्दल एक शब्द : भाग 1

  शब्दसमूहाबद्दल एक शब्द

१) अनुपम : ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही असा

२) अमर : ज्याला मरण नाही असा

३ ) अनमोल : ज्याची किंमत होवू शकणार नाही असे

४) अत्युच्च : अतिशय उंच

५) अतिथी : घरचा नसलेला / पाहुणा

६) अनावृष्टी : पाऊस न पडणे

७) अवर्णनीय : वर्णन करता येणार नाही असे

८) अफवा : खोडसाळपणे पसरवलेली खोटी बातमी

९) अप्पलपोटा : स्वतःच्याच फायदयाचे पाहणारा

१०) अतुलनीय : तुलना करता येणार नाही असा

११) अजिंक्य : कधीही न जिंकला जाणारा

१२) अनाथाश्रम : निराश्रितास आश्रय देणारी संस्था

१३) अगणित : ज्यांची मोजणी करता येत नाही असा

१४) अमृतमहोत्सव : पंच्याहत्तराव्या वाढदिवसाचा उत्सव

१५) अजरामर : ज्याला जरा (म्हातारपण) व मरण नाही तो

१६) अनुयायी : एखादयाच्या मागून जाणारा

१७) अग्रज : आधी जन्मलेला

१८) अनुज : मागून जन्मलेला

१९) अग्यारी : पारशी लोकांचे प्रार्थनास्थळ

२०) अपूर्व : पूर्वी कधीही न पाहिलेले / ऐकलेले असे

२१) अजातशत्रू : ज्यास कोणीही शत्रू नाही असा

२२) अल्पसंतुष्ट : थोडक्यात समाधान मानणारा

२३) अष्टावधानी : अनेक गोष्टींत एकाचवेळी लक्ष देणारा

२४) आगंतुक : तिथी, वार न ठरवता आलेला

२५) अनाकलनीय : समजण्यास, आकलन होण्यास कठीण

२६) आजनुबाहू : ज्याचे हात गुढघ्यापर्यंत पोचतात असा

२७) अंगचोर : अंगराखून काम करणारा / काम चुकार

२८) अंकित : दुसऱ्याच्या ताब्यात असलेला

२९) अंगाई : लहान मुलांना झोपविण्यासाठीचे गाणे

३०) आपादमस्तक : पायापासून डोक्यापर्यंत

३१) आत्मश्लाघा : स्वतःची स्वतःच स्तुती करणे

३२) आस्तिक : ईश्वरावर विश्वास ठेवणारा / देव आहे अस मानणारा

३३) आसेतुहिमालयः हिमालय पर्वतापासून लंकेपर्यंत

३४) आबालवृद्ध : लहान मुलापासून वृद्ध माणसांपर्यंत

३५) आत्मवृत्त : आपली हकीकत स्वतःच निवेदन करणे

३६) आदिवासी : अगदी पूर्वीपासून राहणारे

३७) आंतरराष्ट्रीय : राष्ट्राराष्ट्रांतील

३८) ऋणको : पैसे कर्जाऊ घेणारा, कर्जाचा बोजा असणारा

३९) उःशाप : शापापासून काही अटींवर सुटका

४०) उपनगर : मोठ्या शहराजवळ असलेले दुसरे लहान शहर

४१) उपकृत, लाचार : उपकाराखाली ओशाळ बनलेला

४२) उदयोन्मुख : उदयाला येत असलेला

४३) ऐतखाऊ : कामधंदा न करता दुसऱ्यांच्या जीवावर जगणारा

४४) एकलकोंडा : लोकात मिळूनमिसळून न राहणारा

४५) ऐतोबा : श्रम न करता खाणारा, स्वतः कष्ट न करता दुसऱ्यांच्या श्रमावर जगणारा

४६) कवी : कविता रचणारा

४७) कलाकार, कलावंत, कलावान : अंगी एखादी कला असणारा

४८) कर्तव्यपराङ्‌मुख : कर्तव्याकडे पाठ फिरवणारा

४९) कवयित्री : कविता रचणारी

५०) कर्णमधुर : कानास गोड लागणारे

५१) कर्मभूमी : कार्य करण्याचा प्रदेश, कर्तृत्व गाजवलेला प्रदेश

५२) कल्पवृक्ष : सर्व इच्छा पूर्ण करणारा (काल्पनिक) वृक्ष

५३) कामधेनू : सर्व इच्छा पूर्ण करणारी (काल्पनिक) गाय

५४) काव्यगायन : कविता तालासुरात गाऊन दाखविणे

५५) कोडगा : निर्लज्ज, बेशरम, ज्याला लाज नाही असा

५६) कोट्यधीश : कोट्यवधी रूपयांचा धनी

५७) कोंडवाडा : मोकाट जनावरांना कोंडून ठेवण्याचे ठिकाण

५८) कृतज्ञ : केलेले उपकार जाणणारा

५९) कृतघ्न : केलेले उपकार न जाणणारा

६०) कनवाळू : दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा

६१) कमलाक्षी, कमलनयना : कमळाप्रमाणे डोळे असणारी

६२) करपल्लवी : हाताने केलेली खाणाखुणांची भाषा

६३) कलाप्रेमी, कलासक्त : कलेची आवड असणारा

६४) कार्यतत्पर : कार्यात तत्पर असणारा बारा

६५) कार्यमग्न, कार्यरत कार्यात गढून गेलेला

६६) कृष्णपक्ष (वदयपक्ष) : काळोख्या रात्रीचा पंधरवडा

६७) खग : आकाशात गमन करणारा, पक्षी

६८) खेळाडू : खेळाची आवड असणारा, खेळ खेळणारा

६९) गाभारा : मूर्ती जिथे असते तो देवालयातील भाग

७०) गायरान : गाईसाठी चरण्यासाठी राखलेले रान

७१) गीतकार : गीते रचनारा

७२) गोदाम, कोठार, वखार : धान्यादी साठविण्याची बंदिस्त जागा

७३) गोठा : गाई/गुरे जेथे बांधून ठेवतात ती जागा

७४) गारूडी : सापाचा खेळ करणारा

७५) गगनभेदी : आकाशाचा भेद करणारे

७६) गर्भश्रीमंत : जन्मापासून श्रीमंत

७७) घरकोंबडा : नेहमी घरात बसून राहणारा

७८) घरभेदी : शत्रूला सामील झालेला, फितूर, घरात भांडणे लावणारा

७९) चतुष्पाद : चार पाय असलेला

८०) चर्च : ख्रिश्चनांचे प्रार्थनास्थळ

८१) चक्रधर, चक्रपाणि : ज्याच्या हाती चक्र आहे असा

८२) चक्रव्यूह : सैन्याची चक्राकार केलेली रचना

८३) चव्हाटा, चौक : चार रस्ते एकत्र येतात ती जागा

८४) चिंतामणी : चिंता हरण करणारा मणी

८५) चावडी : गावाच्या न्यायनिवाड्याची जागा

८६) जलचर : पाण्यात राहणारा

८७) जिवलग : जिवाला जीव देणारा

८८) जितेंद्रिय : ज्याने सर्व इंद्रिय जिंकली आहेत असा

८९) जिज्ञासू : जाणून घेण्याची इच्छा करणारा

९०) जेता : विजय मिळवलेला

९१) जगन्नाथ : जगाचा स्वामी

९२) जन्मभूमी : जिथे जन्म झाला आहे तो देश

९३) झंझावात : सोसाट्याचा वारा

९४) झावळ्या : नाणी पाडण्याचा कारखाना / जागा

९५) टाकसाळ : नारळाच्या झाडाची पाने

९६) डोळस : डोळ्यांनी पहावयास समर्थ असलेला, जाणता

९७) ढगाच्छादित, मेघाच्छादित ढगांनी भरलेले, अच्छादून गेलेले

९८) तपोवन : तप करण्याची जागा

९९) तबेला, पागा घोडे बांधायची जागा

१००) तगाई : शेतकऱ्यांना मिळणारे सरकारी कर्ज

१०१) तट : किल्ल्याच्या भोवतीची भिंत

१०२) ताम्रपट तांब्याच्या पत्र्यावर लिहलेले लेख

१०३) तिठा : तीन रस्ते एकत्र येतात ती जागा

१०४) तितिक्षा : हालअपेष्टा सहन करण्याचा गुण

१०५) तुरूंग, बंदिशाळा, कारागृह कैदी जेथे ठेवतात ती जागा

१०६) त्रैमासिक : तीन महिन्यांनी प्रसिद्ध होणारे

१०७) दरवेशी : अस्वलाचा खेळ करणारा

१०८) दानशूर : दानधर्म करण्यात प्रसिद्ध

१०९) दाता : दानधर्म करणारा

११०) द्विज : दोनदा जन्मलेला

१११) दीर्घोदयोगी: सतत उद्योग करणारा

११२) द्वीपकल्प : तिन्ही बाजूंनी पाणी असलेला प्रदेश

११३) दुतोंड्या : दोन्ही बाजूंनी बोलणारा

११४) दुआब / दोआब दोन नदद्यांमधील जागा

११५) दोषैक दोष : गुणांकडे डोळेझाक करून केवळ दोष काढण्याचा स्वभाव

११६) दैनिक : दररोज प्रसिद्ध होणारे वर्तमानपत्र

११७) दैववादी : दैवावर भरवसा ठेवून राहणारा

११८) दंतकथा : एकाने दुसऱ्यास सांगून चालत असलेली गोष्ट

११९) दिनक्रम : संपूर्ण दिवसाचा कार्यक्रम

१२०) द्वारपाल : दारावरील पहारेकरी

१२१) दलित : समाजाकडून उपेक्षिलेले व पीडले गेलेले

१२२) दीर्घायुषी : भरपूर आयुष्य असणारा

१२३) दुराग्रही : हट्टीपणा करणारा

१२४) धनको : पैसे कर्जाऊ देणारा

१२५) धर्मातर : दुसऱ्या धर्मात प्रवेश

१२६) धबधबा : उंचावरून पडणारा पाणलोट

१२७) धर्मशाळा : वाटसरूंना राहण्यासाठी धर्मार्थ बांधलेली इमारत

१२८) धर्मसंस्थापक धर्माची स्थापना करणारा

१२९) ध्येयनिष्ठ : विशिष्ट ध्येय समोर ठेवून वागणारा

१३०) नखशिखान्त: पायाच्या नखापासून शेंडीपर्यंत

१३१) नट : नाटकात भूमिका करणारा पुरूष

१३२) नभोवाणी, आकाशवाणी आकाशातून ऐकू येणारी वाणी

१३३) नवमतवादी, पुरोगामी नव्या मताप्रमाणे वागणारा

१३४) नाटककार नाटक लिहिणारा

१३५) नाविक : नावाडी होडी, नाव चालविणारा

१३६) नास्तिक : ईश्वर नाही असे मानणारा

१३७) नागरिक : देशात कायम वस्ती करणारा

१३८) निरिच्छ : कशाचीही इच्छा न करणारा

१३९) निराधार : कुणाचाही आधार नसलेला

१४०) निर्वाळा : खात्रीपूर्वक

१४१) निर्वासित : घरादारास व देशास पारखा झालेला

१४२) निर्व्यसनी कोणतेही व्यसन नसलेला

१४३) निसर्गसुंदर : मुळचाच सुंदर, स्वभावतःच सुंदर

१४४) निरक्षर : लिहितावाचता न येणारा

१४५) निर्माल्य : देवाला वाहून शिळी झालेली फुले

१४६) निःपक्षपाती : कोणत्याही पक्षाची बाजू न घेणारा

१४७) नैपुण्य : कौशल्य, कसब

१४८) नंदादीप : देवापुढे मंद पण सतत जळणारा दिप

१४९) नंदनवन : स्वर्गातील इंद्राची बाग

१५०) नांदी : नाटकाच्या प्रारंभीचे स्तवन गीत

१५१) न्यायनिष्ठ : न्यायाच्या कामात अत्यंत दक्ष

१५२) नियतकालिक : ठरलेल्या कालावधीत प्रसिद्ध होणारे

१५३) निर्लज्ज : लाज नसलेला

१५४) निष्कलंक : कसलाही डाग नसलेला

१५५) निःस्वार्थी : स्वतःच्या फायद्याचा विचार न करता कार्य करणारा

१५६) परावलंबी : दुसऱ्यावर अवलंबून असणारा

१५७) परस्परावलंबी : एकमेकांवर अवलंबून असणारे

१५८) परिचारिका : रुग्णांची सेवा करणारी

१५९) परोपकारी : दुसऱ्यावर उपकार करणारा

१६०) पादचारी : पायी चालणारा

१६१) पाणपोई : मोफत पाणी मिळण्याची सोय

१६२) पाणवठा : गावातील एकत्र पाणी भरण्याची जागा

१६३) पाक्षिक : पंधरवड्याने प्रसिद्ध होणारे

१६४) पारदर्शक : ज्यातून आरपार दिसते असा

१६५) पाषाणहृदयी : दगडासारखे हृदय असणारा, कठोर

१६६) पांजरपोळ : जनावरांना फुकट पोसण्याचे ठिकाण

१६७) पूरग्रस्त : पुरामुळे ज्याचे नुकसान झाले आहे

१६८) पोरका : अनाथ , ज्याला आईवडील नाही असा

१६९) पंचांग : तिथी, वार, नक्षत्र, योग, करण यांची पुस्तिका

१७०) पंच : तंटा सोडवण्यासाठी उभय पक्षांनी मान्य केलेले लोक

१७१) प्रलयकाळ : जगाचा नाश होण्याची वेळ

१७२) पाऊलवाट : फक्त माणसाला पायी जाता येईल एवढी अरुंद वाट

१७३) पागा : किल्यातील घोडे बांधण्याची जागा

१७४) पाणबुडी : पाण्याखालून चालणारी बोट

१७५) पाणंद, पाणद, पाळंद : समोरासमोरील कुंपणामुळे तयार झालेली गावातील किंवा शेतातील लहान वाट

१७६) पारदर्शक : ज्याच्यातून आरपार दिसू शकते अशी

१७७) पाश्चिमात्य, पाश्चात्य : युरोप, अमेरिका या पश्चिमेकडील देशांतील लोक कार्य

१७८) पुराणमतवादी सनातनी : जुन्या मतांना चिकटून राहणारा

१७९) पुरोगामी : आधुनिक विचारांचा दृष्टीकोन असणारा

१८०) पूर्वाभिमुख : पूर्वेकडे तोंड करून असलेला