शब्दसमूहाबद्दल एक शब्द : भाग 2
शब्दसमूहाबद्दल एक शब्द
१८१) पेय : पिण्यास योग्य असलेला द्रवपदार्थ
१८२) फितूर : शत्रूला सामिल असलेला
१८३) बहुरूपी : निरनिराळ्या प्रकारच्या माणसांची सोंगे घेणारा
१८४) बातमीदार, वार्ताहर : बातमी आणून देणारा, बातमी मिळवणारा
१८५) बिनतक्रार : कोणतीही तक्रार न करता
१८६) बुदिधीजीवी : बुदिधचा उपयोग करून जगणारे
१८७) बोगदा : डोंगर, पोखरून आरपार केलेला रस्ता
१८८) बेट : चार बाजूंनी प्राणी असलेला प्रदेश
१८९) बिनबोभाट : कोणालाही कळू न देता
१९०) बारमाडी : बारा खिडक्या असलेला महाल
१९१) बारभाई : बाराजणांचा कारभार
१९२) बहुश्रुत : ज्याला खूप माहिती आहे असा
१९३) भाकडकथा : निरर्थक सांगितलेल्या गोष्टी
१९४) भाट : स्तुती करणारा
१९५) भांडकुदळ : भांडण उकरूण काढणारा
१९६) मदारी : माकडाचा खेळ करून दाखवणारा
१९७) मनकवडा : दुसऱ्याच्या मनातले ओळखणारा
१९८) महत्त्वाकांक्षी मोठ्या इच्छा असणारा
१९९) मल्लिनाथी : एखाद्या गोष्टीवर केलेली खोचक टीका
२००) माधुकरी : अनेक ठिकाणी हिंडून मिळालेली भिक्षा
२०१) माहूत : हत्तीला काबूत ठेवणारा
२०२) माहेर : लग्न झालेल्या मुलींच्या आईबापाचे घर
२०३) मानधन : कामाबद्दल दिलेले सन्मानाचे धन
२०४) मासिक : महिन्यातून एकदा प्रसिद्ध होणारे
२०५) मित्तभाषी : मोजके असे बोलणारा
२०६) मिश्रविवाह : आंतरजातीय विवाह: भिन्न जातीतील वधु-वरांचा विवाह
२०७) मीनाक्षी : माशासारखे डोळे असणारी
२०८) मूर्तिकार : मूर्ती घडविणारा
२०९) मेंढवाडा : पाळलेल्या मेंढ्यांचे राहण्याचे ठिकाण
२१०) म्हातारचळ : म्हातारपणी बुदिधला झालेला विकार
२११) मृगाक्षी, मृगनयना हरिणासारखे डोळे असणारी
२१२) मचाण : शिकारीसाठी / निरिक्षण करण्यासाठी रानात बांधलेला सुरक्षित उंच माळा
२१३) माचा : पिकाच्या संरक्षणासाठी केलेला मांडव
२१४) मितव्ययी : काटकसरीने खर्च करणारा
२१५) मिताहारी : मोजकाच आहार घेणारा
२१६) मुद्देसुद : मुद्द्याला धरून असलेले
२१७) मूर्खशिरोमणी: कमालीचा मुर्ख
२१८) मूर्तिपूजक : मूर्तीची पूजा करणारा
२१९) मृत्युंजय : मृत्युवर विजय मिळवणारा
२२०) युगपुरूष, युगप्रवर्तक समाजातील परिस्थिती बदलून तिला योग्य वळण लावणारा
२२१) राजमान्य : राजाने दिलेली मान्यता
२२२) रामबाण : अचूक गुणकारी असणारे
२२३) रूग्णालय : रोगी ठेवण्याची जागा
२२४) रपाशूर, रणवीरः युद्धात शौर्य दाखवणारा
२२५) रत्नजडित : रत्नांनी मढवलेले
२२६) राजनर्तिका : राजाच्या दरबारात नृत्याचे काम करणारी स्त्री
२२७) रामप्रहार, पहाट: सूर्योदयापूर्वीचा सुरूवातीचा काळ
२२८) लघुकथाकार : लघुकथा लिहिणारा
२२९) लेखनशैली : लिहिण्याची हातोटी
२३०) लोकमान्य : लोकांची मान्यता दिलेला
२३१) लेखक/लेखिका : लेखन करणारा /करणारी
२३२) लोकशाही : लोकहितासाठी लोकांची सत्ता असणारी राज्यपद्धती
२३३) लोकप्रिय : लोकांना आवडणारी
२३४) लोकोत्तर : सामान्य लोकांना अपवादाने आढळणारा सज्जन
२३५) वंदता : ऐकीव गोष्टी
२३६) वहऱ्हाडी : लग्नासाठी जमलेले लोक
२३७) वक्ता : भाषण करणारा
२३८) वक्तृत्व : भाषण करण्याची कला
२३९) वामकुक्षी : दुपारच्या जेवणानंतरची अल्प झोप
२४०) वावटळ : वर्तुळाकार फिरणारा सोसाट्याचा वारा
२४१) वार्षिक : वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे नियतकालिक
२४२) वाचनालय : वर्तमानपत्रे, मासिके इ. वाचण्याचे ठिकाण
२४३) वाटाड्या : वाट दाखविणारा
२४४) विधवा : पती मरण पावला आहे अशी स्त्री
२४५) विधुर : ज्याची पत्नी मरण पावली आहे असा पुरूष
२४६) विघ्नहर्ता : संकट दूर करणारा
२४७) विदुषी : विद्वान स्त्री
२४८) वीरमरण : रणांगणावर आलेले मरण
२४९) वैमानिक : विमान चालविणारा
२५०) वैष्णव : विष्णुची भक्ती करणारा
२५१) वृत्तनिवेदक : बातमी सांगणारा
२५२) व्यासपीठ : भाषण करण्याची उंचावरील जागा
२५३) विनावेतन : पगार न घेता
२५४) व्याख्याता : व्याख्यान देणारा
२५५) व्यवहारशून्य : व्यवहाराविषयी काहीही न कळणारा
२५६) वरमाय : नवऱ्या मुलाची आई
२५७) वर्णनशैली : वर्णन करण्याची हातोटी
२५८) वडिलोपार्जित : वाडवडिलांकडून मिळालेले
२५९) शिलालेख : दगडावर कोरून लिहलेले लेख
२६०) शिल्प : दगडावर केलेले कोरीव काम
२६१) शैव : शंकराची भक्ती करणारा
२६२) शतायुषी : शंभर वर्षे आयुष्य असणारा
२६३) शाश्वत : कायम टिकणारे
२६४) शुक्लपक्ष, शुद्धपक्ष : चांदणे असलेला पंधरवडा
२६५) शेजारधर्म : शेजाऱ्याबाबत वागण्याचे कर्तव्य
२६६) श्रद्धाळू : श्रद्धा असणारा
२६७) श्रमजीवी : श्रम करून जीवन जगणारे
२६८) श्रोता : दुसऱ्याचे भाषण ऐकणारा
२६९) षण्मासिक : सहा महिन्यांनी प्रसिद्ध होणारे
२७०) सधवा, सुवासिनी : जिचा पती जिवंत आहे अशी
२७१) सत्यवचनी : नेहमी सत्य बोलणारा
२७२) सत्याग्रही : सत्यासाठी झगडणारा, आग्रही असणारा
२७३) समाजसेवक : समाजाची सेवा करणारा
२७४) सदावर्त, अन्नछत्र : मोफत भोजन मिळण्याचे ठिकाण
२७५) साम्यवादी : सर्व समाजात समानता पाहिजे असा आग्रह धरणारा
२७६) साक्षर : लिहिता-वाचता येणारा
२७७) सिंहावलोकन : मागच्या काळाकडे ओझरती नजर टाकणे
२७८) सुस्कारा : दुःखामुळे सोडलेला दीर्घ श्वास
२७९) संकलक : बातमी, मजकूर संकलन करणारा
२८०) संपादक : संपादन करणारा
२८१) संगम : दोन नदया एकत्र मिळण्याची जागा
२८२) संस्मरणीय : कायम स्मरणात राहील असे
२८३) स्वगत : स्वतःशी केलेले भाषण
२८४) स्वच्छंदी : आपल्या लहरीप्रमाणे वागणारा
२८५) स्वयंसेवक : स्वतः होऊन दुसऱ्याच्या सेवेचे व्रत घेणारा
२८६) स्मारक : मरण पावलेल्याची आठवण राहावी म्हणून योजलेली गोष्ट
२८७) स्वामिनिष्ठ : धन्याची प्रामाणिक चाकरी करणारा
२८८) स्वावलंबी : स्वतःवर अवलंबून असणारा
२८९) सनातनी : जुन्या रूढींचे पालन करणारा
२९०) सभाधीट : सभेत धीटपणाने भाषण करणारा
२९१) समकालीन : एकाच काळातील
२९२) संस्थापक : एखादया संस्थेची स्थापना करणारा
२९३) स्वगत : स्वतःशी केलेले भाषण
२९४) स्वदेशी : आपल्याच देशात तयार झालेली
२९५) स्वार्थत्यागी : स्वतःच्या हिताचा त्याग करणारा
२९६) स्वार्थपरायण, स्वार्थी : स्वतःच्याच फायद्याचा विचार करणारा
२९७) स्वाभिमानशून्यः स्वतःचा मुळीच अभिमान नसणारा
२९८) स्वाभिमानी : स्वतःचा अभिमान असणारा
२९९) साप्ताहिक : आठवड्याने प्रसिद्ध होणारे नियतकालिक
३००) स्थितप्रज्ञ : कोणत्याही परिस्थितीत ज्याची बुद्धी स्थिर राहते तो
३०१) सुभाषित : बोधपर वचन
३०२) सुविचार : चांगला विचार
३०३) सुसाध्य, सहजसाध्य : सहज साध्य होऊ शकणारे
३०४) सूत्र : मोजक्या शब्दांत सांगितलेले तत्त्व
३०५) हस्तलिखित : हाताने लिहिलेले
३०६) हुतात्मा : देशासाठी प्राणार्पन केलेला
३०७) हेर, खबऱ्या : शत्रूकडील बातमी काढून आणणारा
३०८) हृदयस्पर्शी : हृदयाला भिडणारे
३०९) हतभागी, हतभागिनी: जिचे / ज्याचे भाग्य नाहीसे झाले असा
३१०) हृदयद्रावक : अंतःकरणाला पाझर फोडणारे
३११) क्षितीज : जिथे आकाश जमिनीला टेकल्या सारखे दिसते ती काल्पनिक रेषा
३१२) क्षणभंगूर : थोडा काळ टिकणारे